श्री समर्थ पतसंस्था | गृहकर्ज सुविधा – आपल्या स्वप्नातील घरासाठी श्री समर्थ पतसंस्थेची विश्वासार्ह साथ #PCMCFinance #KuruliPatsanstha #ChimbaliPhata #PuneCooperativeBank
परवडणारे व्याजदर, जास्त कर्जमर्यादा
संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या माहितीनुसार, गृहकर्ज योजनेत कर्जदारांना १२ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळणार आहे (*अटी आणि नियम लागू). तसेच, सभासदांना ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार असून, परतफेडीसाठी लवचिक योजना ठेवण्यात आली आहे. यामुळे पगारदार तसेच स्वयंपूर्ण व्यावसायिक दोन्ही गटांना ही योजना सोयीस्कर ठरणार आहे.
सोपी प्रक्रिया, सुरक्षित व्यवहार
गृहकर्ज हे सहसा संबंधित घर अथवा जमिनीवर गहाण ठेवून दिले जाते. त्यामुळे कर्जदाराला जास्त रकमेचं कर्जही सहज मिळू शकतं. संस्थेने सर्व व्यवहार पारदर्शक व सुरक्षित ठेवण्याचे धोरण अवलंबले असून, यामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी
गृहकर्ज घेण्यासाठी सभासदांना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात:
-
कर्ज अर्ज (Loan Application)
-
उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)
-
पासपोर्ट साईज फोटो
-
पॅन कार्ड
-
आधार कार्ड
-
दोन हमीदारांची सर्व कागदपत्रांसह माहिती
सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गेल्या काही महिन्यांत या योजनेचा मोठ्या प्रमाणावर सभासदांनी लाभ घेतल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. विशेषतः गृहकर्जामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना घर खरेदीची किंवा दुरुस्तीची सोय परवडणाऱ्या पद्धतीने करता आली आहे.
संस्थेची भूमिका
२५ वर्षांहून अधिक काळ समाजाची आर्थिक गरज ओळखून सेवा देणारी श्री समर्थ पतसंस्था केवळ कर्जपुरवठा करत नाही, तर प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीत भागीदार होण्याचा प्रयत्न करत आहे.
“गृहकर्ज ही सुविधा म्हणजे सभासदांच्या स्वप्नांना बळ देणारी पायरी आहे,” असं संस्थेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केलं.
📍 संपर्क :
श्री समर्थ पतसंस्था
मुख्य शाखा – चिंबळी फाटा, पुणे
📞 72760 92096
Comments
Post a Comment