राष्ट्रीय क्रीडा दिन : खेळातून आरोग्य, शिस्त आणि यशाची प्रेरणा
दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. खेळ म्हणजे केवळ मैदानावरचा विजय नव्हे, तर शिस्त, मेहनत, संयम, आत्मविश्वास आणि संघभावना शिकवणारा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याला विशेष महत्त्व आहे. नियमित व्यायाम आणि खेळामुळे शरीर निरोगी राहते, तर मन प्रसन्न आणि सकारात्मक राहण्यास मदत होते. खेळातून मिळणारी हार स्वीकारण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची वृत्ती हीच आयुष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देते. श्री समर्थ न...