श्री समर्थ पतसंस्थेचा ३२० कोटी व्यवसायाचा टप्पा पार.

चिंबळी फाटा (प्रतिनिधी):

श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेने ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल ३२० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.


संस्थेच्या आर्थिक प्रगतीत ठेवी व कर्जवाटप यांचा महत्त्वाचा वाटा असून, १८१ कोटी रुपयांच्या ठेवी आणि १३९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे वसुल भागभांडवल ८ कोटी ३९ लाख रुपये, तर निधी ८ कोटी २३ लाख रुपये इतक्या आहे. संस्थेची गुंतवणूक ५३ कोटी ८६ लाख रुपये असून खेळते भागभांडवल २०४ कोटी रुपये इतके आहे.


संस्थेची आर्थिक शिस्त आणि सक्षम व्यवस्थापन यामुळे ग्रॉस एनपीए २.९३%, नेट एनपीए २.५४% आणि थकबाकी केवळ १.०४% इतकी मर्यादित ठेवण्यात यश आले आहे.


चालू आर्थिक वर्षात सभासद, ठेवीदार व कर्जदार यांच्या सक्रिय सहकार्यामुळे संस्थेने हा यशस्वी टप्पा गाठल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. याबद्दल संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ संभाजीशेठ गवारे व संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गवारे यांनी सर्व सभासद, ठेवीदार व ग्राहकांचे आभार मानले आहेत

Comments

Popular posts from this blog

महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग – श्री समर्थ पतसंस्था आयोजित नथ मेकिंग कार्यशाळा #PCMCFinance #KuruliPatsanstha #ChimbaliPhata #PuneCooperativeBank

२५ वर्षांचा विश्वास — ‘श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था’ने घडवली आर्थिक सबलीकरणाची नवी वाट

तुमच्या मौल्यवान वस्तूंसाठी सुरक्षित पर्याय – श्री समर्थ पतसंस्थेची आधुनिक लॉकर सुविधा #KuruliPatsanstha #ChimbaliPhata #PuneCooperativeBank #somatnephata