महिलांसाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग – श्री समर्थ पतसंस्था आयोजित नथ मेकिंग कार्यशाळा #PCMCFinance #KuruliPatsanstha #ChimbaliPhata #PuneCooperativeBank
संस्था रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा महिलांना पारंपरिक दागिन्यांची कला शिकवण्यासोबतच स्वावलंबनाचाही मार्ग दाखवणार आहे.
फक्त एका दिवसात प्रोफेशनल प्रशिक्षण
या कार्यशाळेत महिलांना एक दिवसात प्रोफेशनल नथ मेकिंग चे प्रशिक्षण मिळणार असून, चार ते सहा प्रकारच्या ट्रेंडिंग नथ डिझाईन्स शिकवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे सहभागी महिला स्वतः बनवलेली नथ घरी घेऊन जाऊ शकणार आहे.
प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य संस्थेमार्फत पुरवले जाणार असून, AD स्टोन नथ, ब्रायडल नथ, इयर कप (कानफुल) तयार करण्याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून दिले जाईल.
रौप्य महोत्सवानिमित्त विशेष ऑफर
संस्थेची मूळ कार्यशाळा फी 2000 रुपये असली तरी रौप्य महोत्सवानिमित्त विशेष 70% सूट देऊन फक्त 600 रुपये इतकी फी निश्चित करण्यात आली आहे.
-
📍 ठिकाण: श्री समर्थ पतसंस्था, त्रिमूर्ती प्लाझा, सोमाटणे फाटा, मावळ, पुणे
-
🕛 वेळ: दुपारी 12 ते 5
उत्पन्नाचा नवा मार्ग
फक्त कला शिकवणे एवढ्यापुरतेच या कार्यशाळेचे उद्दिष्ट मर्यादित नाही. महिलांना या कार्यशाळेतून डायरेक्ट मार्केटिंग, विक्री तंत्रज्ञान आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे पुढे जाऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
समाजासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
नथ हा फक्त दागिना नसून भारतीय परंपरेचे प्रतीक आहे. विवाहसोहळे, सण-समारंभ यामध्ये नथेला कायम मागणी असते. त्यामुळे ही कला महिलांना शिकणे म्हणजे सांस्कृतिक वारसा जपणे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे, असेच म्हणावे लागेल.
नावनोंदणी सुरु
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जागा मर्यादित असल्याने लवकर नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
☎️ संपर्क: 7558625354 / 9284057873
Comments
Post a Comment